ओडिशातील चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा
   दिनांक :08-May-2019
भुवनेश्वर,
ओडिशातील कोरपुट जिल्ह्यात आज बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने तीन महिला नक्षलवाद्यांसह पाच जणांचा खात्मा केला, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने दिली. 
 
 
विशेष संचालन समूह (एसओजी) आणि जिल्हा स्वयंसेवी दलाचे जवान पडुआ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलामध्ये शोध मोहीम राबवत असताना ही चकमक झडली. ही दोन्ही पथके जंगलामध्ये संयुक्तपणे गस्त घालत असताना नक्षलवाद्यांना सुरक्षा दलाचे पथक आल्याचा सुगावा लागला. त्यांनी पथकावर गोळीबार सुरू केला.
 
सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाच नक्षलवादी ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक (नक्षलविरोधी अभियान) आर. पी. कोचे यांनी दिली. या परिसरात 15 माओवादी लपून बसल्याची गुप्त माहिती आम्हाला प्राप्त झाली होती. घटनास्थळावरून पाच बंदुका जप्त करण्यात आल्याची माहिती कोरपुटचे पोलिस अधीक्षक के. व्ही. िंसग यांनी दिली.