मायावती पंतप्रधान झाल्या तर त्या मला मुख्यमंत्री करतील : अखिलेश यादव
   दिनांक :08-May-2019
लखनौ,
अखिलेश यादव यांनी मायावतींना पंतप्रधान बनविण्याची इच्छा बोलून दाखवली असून, त्या आपल्याला मु‘यमंत्री करतील, अशी अपेक्षाही अखिलेश यादव यांनी व्यक्त केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. उत्तरप्रदेशमध्ये अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात असलेल्या बसपा नेत्या मायावती आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पुन्हा एकत्र येत सत्तेची गणिते जुळवायला सुरुवात केली आहे, हे येथे उल्लेखनीय. 

 
 
या मुलाखतीमध्ये अखिलेश यादव म्हणाले, मी मायावती यांना पंतप्रधान बनविण्यासाठी मदत करणार आहे, तर त्या मला उत्तरप्रदेशचा मुख्यमंत्री बनविण्यासाठी सहकार्य करतील. आमच्यातील परस्पर सामंजस्यातून हे ठरले आहे.
उत्तरप्रदेशमध्ये सपा आणि बसपा यांच्यातील महाआघाडी एका संकल्पपूर्तीसाठी आम्ही केली आहे. हा संकल्प म्हणजे, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावरून हटविणे हा आहे. आमची महाआघाडीच देशाला भाजपापासून वाचवू शकते, असे सांगत त्यांनी महाआघाडीचे जोरदार समर्थन केले. यावेळी अखिलेश यादव म्हणाले, आम्ही लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही एकत्र निवडणुका लढविणार आहोत.
.....