बालाकोटमध्ये १३० ते १७० दहशतवादी मारले गेले, परदेशी पत्रकाराचा दावा
   दिनांक :08-May-2019
तभा ऑनलाईन  
नागपूर,
पाकिस्तानातील बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकसंदर्भात नवी माहिती समोर . या एअर स्ट्राइकमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या १३० ते १७० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा परदेशी पत्रकाराने दावा केला आहे. पत्रकार फ्रान्सेस्का मॅरिनोच्या रिपोर्टनुसार, आताही शिबिरांमध्ये जवळपास ४५ जणांवर उपचार सुरू आहे. २० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एअर स्ट्राइक करण्यात आलेला भाग अद्यापही सील करून ठेवण्यात आलेला आहे. 
 
बालाकोटमध्ये भारताने एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानी सेना तिकडे पोहोचले आहे. जखमींना शिनकियारीमधील एका हरकत-उल-मुजाहिद्दीन शिबिरात नेण्यात आले आणि पाक सैन्याच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. जे लोकांवर उपचार करण्यात आले आहेत, ते अद्यापही पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात आहेत. त्यांना अद्याप घरी सोडण्यात आलेले नाही. एअर स्ट्राइकमध्ये ठार झालेल्यांमध्ये ११ दहशतवाद्यांचे प्रशिक्षक होते. ज्यात बॉम्ब बनवण्यापासून ते शस्त्रास्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा समावेश आहे. 
भारताने एअर स्ट्राइकमध्ये बालाकोटमधले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. या एअर स्ट्राइकमध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. परंतु किती दहशतवादी मारले गेले यावरून काहीसा संभ्रम आहे. त्यातच आता १३० ते १७० दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.