भारत करणार एअर स्ट्राइकदरम्यान वापरलेल्या 'त्या' बॉम्बची खरेदी
   दिनांक :08-May-2019
नवी दिल्ली,
 
हवाई दलानं एअर स्ट्राइकदरम्यान वापरलेल्या स्पाईस 2000 बॉम्बची पुन्हा एकदा इस्राईलकडून खरेदी करण्यात येणार आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी  हवाई दलानं स्पाईस 2000 बॉम्बचा वापर केला होता. या बॉम्बनं अचूक निशाणा साधत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.
 
 
ताफ्यातील शस्त्र आणखी अत्याधुनिक करण्यासाठी हवाई दलाकडून स्पाईस 2000 बॉम्बची खरेदी करण्यात येणार आहे. कोणत्याही इमारतीला उद्ध्वस्त करण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीनं या बॉम्बचा वापर करता येतो. या बॉम्बच्या आधीच्या व्हर्जनमध्ये इमारतीला भेदण्याची आणि त्यानंतर इमारतीत स्फोट घडवण्याची क्षमता होती.