ऑस्ट्रेलियाचा 'हा' खेळाडू वर्ल्ड कप संघाबाहेर

    दिनांक :08-May-2019
मेलबर्न,
 
ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनच्या खांद्याला दुखापत झाल्याने त्यांना वर्ल्ड कप संघाच्या बाहेर बसावे लागणार आहे. त्यांच्याऐवजी बोर्डाने केन रिचर्डसन यांना संधी दिली आहे. मार्चमध्ये पाकिस्तानविरोधातल्या दुसऱ्या वनडेमध्ये झाय रिचर्डसन जखमी झाले होते. त्यानंतरही त्यांचा वर्ल्ड कप संघात समावेश करण्यात आला होता. भारतात झालेल्या वनडे सीरिजमध्येही त्यांनी उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन केले होते आणि पाच सामन्यात सात बळी मिळवले होते. त्यानंतर त्यांना संघातील प्रमुख गोलंदाज समजले जात होते.
 
 
गेल्या 12 सामन्यात त्यांनी 24 बळी मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मेडिकल स्टाफनं त्यांची तपासणी केली असता ते वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी पूर्णतः तंदुरुस्त नसल्याचं समोर आलं होतं. ऑस्ट्रेलिया टीमच्या डेव्हीड बेकली यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. बेकली म्हणाले, ही बातमी टीम आणि झायसाठी दुर्दैवी आहे. गेल्या काही काळापासून झाय शानदार प्रदर्शन करत आहे. परंतु ते वर्ल्ड कपसाठी खेळण्यास तंदुरुस्त नसल्याचे मेडिकल चेकअपमधून उघड झाले.
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डानं झाय रिचर्डसनच्या जागी केन रिचर्डसनला संघात जागा दिली आहे.