पाकिस्तान; सुफी दर्ग्याबाहेर स्फोट,९ ठार
   दिनांक :08-May-2019
लाहोर,
 
पाकिस्तानातील लाहोर येथील आज प्रसिद्ध सुफी दर्ग्याबाहेर शक्तिशाली स्फोटा झाला. त्यात किमान नऊ जण ठार झाले. मृतांमध्ये पाच पोलिसांचा समावेश आहे. तर अनेक जण जखमी झाले.
 
 
सुफी दर्ग्यातील दाता दरबारबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनात स्फोट झाला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दाता दरबारजवळील गेट क्रमांक २ समोरील पोलिसांच्या दोन वाहनांमध्ये स्फोट झाला. पाच पोलिसांसह सुरक्षा रक्षक आणि एक नागरिक यात झाले . या स्फोटात २४ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती लाहोरमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी अश्फाक अहमद खान यांनी एका वृत्तवाहिनीला  दिली. हा आत्मघाती हल्ला होता की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.