‘चौकीदार चोर है’ ही घोषणा माझी नव्हेच : राहुल गांधी
   दिनांक :08-May-2019
तभा ऑनलाईन 
भिंड,
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मध्य प्रदेशातील भिंड येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना, 'चौकीदार चोर है’ ही घोषणा माझी किंवा काँग्रेसची नव्हेच अशी भूमिका घेतली. त्यांनी या सभेत ‘चौकीदार चोर है’ ही घोषणा कशाप्रकारे अस्तित्वात आली याबाबत खुलासा केला आहे. 
 
 
याबाबत सांगताना ते म्हणाले की, “मला आज काही माध्यम प्रतिनिधींनी ‘चौकीदार ही चोर है’ या घोषणेची निर्मिती कोणी केली असा प्रश्न विचारला. मुळात ही घोषणा मी किंवा काँग्रेसने तयार केली नाही. मी एकदा छत्तीसगढ येथे एका जाहीर सभेला संबोधित करत असताना म्हणालो होतो की, ‘चौकीदाराने २ कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते, १५ लाख खात्यावर जमा करण्याचं आश्वासन दिले होते’ मी बोलत असतानाच सभेला आलेल्या १० ते १५ तरुणांनी ‘चोर है’ असा नारा दिला. मी ते काय म्हणतायेत हे ऐकू न शकल्याने मी त्यांना पुन्हा एकदा घोषणा द्यायला सांगितले आणि ‘चौकीदार चोर है’ या घोषणेची निर्मिती झाली.”
 
“त्या सभेत आलेल्या तरुणांनी ‘चौकीदार चोर है’ या घोषणेची निर्मिती केली असून ही घोषणा या देशातील तरुणांची, शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची आहे” असे ते यावेळी म्हणाले.