आजचे राशी भविष्य, दि. ०८ मे २०१९
   दिनांक :08-May-2019
मेष- अडकलेली कामं मार्गी लागतील. कौटुंबीक संबंध सुधारतील. स्वत:ची प्रतिमा सुधारण्याती संधी मिळेल. दिवस उत्साही आणि अधिक मनोरंजक असेल. कौटुंबीक कामांमध्ये अडकाल. जुन्या आजारांपासून आराम मिळेल.
वृषभ- कामाच्या ठिकाणी आदर मिळेल. मेहनत करा. अकडलेली कामं पूर्ण होतील. अनेक क्षेत्रांमध्ये तुम्ही सक्रिय असाल. जीवनात पुढे जाण्यासाठी काही महत्त्वाचे बदल करावे लागतील. प्रवासयोग आहे.
मिथुन- घाईघाईत कोणतंच काम करु नका. आर्थिक व्यवस्थेविषयीही जास्त विचार करु नका. अवाजवी खर्च होऊ शकतो. नोकरी आणि व्यवसायात काही अडचणी वाढतील. आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी तणावाचं वातावरण पाहायला मिळू शकतं. पोटाचे विकार उदभवू शकतात.
कर्क- नोकरीच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. दैनंदिन कामांतील अडचणीही वाढतील. हट्ट केल्यास कोणा एका व्यक्तीशी वाद होऊ शकतो. विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. आरोग्यात चढ- उतार पाहायला मिळतील. डोकेदुखी आणि डोळ्यांना त्रास होईल.
सिंह- कुटुंबात सुख- शांती असेल. कामाच्या ठिकाणी नवे करार होण्याची शक्यता आहे. कोणा एका चांगल्या मित्राशी भेट घडण्याचा योग आहे. लक्ष दुसऱ्याच गोष्टींमध्ये असेल. नोकरीच्या ठिकाणी कोणी व्यक्ती नकळतपणे तुमची मदत करत असेल. साथीदाराकडून अर्थसहाय्य मिळू शकतं.
कन्या- व्यापारात वृद्धी होईल. कनिष्ठांचं सहकार्य मिळेल. काही खास व्यक्तींशी भेट घडण्याचा योग आहे. दैनंदिन कामांतून मोकळीक मिळेल. अडचणी कमी होतील. अपूर्ण कामं मार्गी लागतील, पूर्णही होतील. दिवस थकवणारा असेल. आराम करा नाहीतर काही अडचणी येतील.
तुळ- नोकरी आणि व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. जास्त फायदा मिळवण्यासाठी जास्त प्रयत्नही करावो लागतील. तुमच्यासाठी नशीबाची साथ आहेच. इतरांना नाराज केल्याशिवाय स्वत:ची कामं पूर्ण करा. साथीदारावर रागवू नका. स्वत:च्या भावना इतरांवर लादू नका.
वृश्चिक- व्यापारात फारसा फायदा होणार नाही. बदलीचा योग आहे. नव्या कामाची सुरुवात करु नका. आजचा दिवस आव्हानात्मक आहे. कामाच्या ठिकाणी लक्ष विचलीत होऊ शकतं.
धनू- दैनंदिन कामं पूर्ण होण्याचा योग आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंब आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल. साथीदारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. आरोग्यात चढ- उतार होण्याची शक्यता आहे. तिखट पदार्थांचं सेवन टाळा.
मकर- नवे व्यवहार आज करुच नका. पैसेही अडकू शकतात. दिवसाची सुरुवात फारशी चांगली नसेल. मनाविरुद्ध खर्च होईल. कुटुंबातीलच काही व्यक्तींमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकतात. काम- काज सुस्तीने होईल.
कुंभ- आर्थिक परिस्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी सर्व कामं मार्गी लावाल. प्रयत्नांनी शंकांचं निरसन कराल. कोणा खास निर्णयाच्या प्रतिक्षेत असाल तर धीर बाळगा, आनंदच मिळेल.
मीन- व्यापार वाढवण्याचा विचार करुच नका. गोष्टी सुरु आहेत तशाच पुढे जाऊद्या. महागड्या वस्तूंची खरेदी करु शकाल. आज एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. सावध राहा. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे