'किक -२' मध्ये दिसणार दीपिका पादुकोण !
   दिनांक :08-May-2019
अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण ही जोडी एकत्र पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. आता चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचे म्हटले जात आहे. सलमान लवकरच ‘किक’ चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येणार आहे. या चित्रपटात सलमानसह दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
 
 
गेल्या काही दिवसांपासून सलमानच्या ‘किक’ चित्रपटाचा सिक्वेल येणार असलाचे म्हटले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ‘किक’च्या या सिक्वेलमध्ये अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ऐवजी दीपिका पादुकोण दिसणार असल्याची शक्यता आहे. हा चाहत्यांसाठी सुखद धक्काच आहे. तसेच या चित्रपटामध्ये दीपिका एक अभिनेत्रीची भूमिका साकरणार असून सलमान प्रमाणेच महत्वाची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
 
 
याआधी किक चित्रपटासाठी जॅकलीन ऐवजी दीपिकाचीच निवड करण्यात आली होती. परंतु काही कारणास्वत दीपिकाने चित्रपटास नकार दिला होता. आता चित्रपट निर्मात्यांनी किकच्या सिक्वेलसाठी दीपिकाची निवड केली आहे. तसेच सलमान आणि दीपिकाचा हा पहिला एकत्र चित्रपट असणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.