मुंबईची विमानसेवा विस्कळीत
   दिनांक :08-May-2019
मुंबई,
मुंबई विमानतळावरील हवाईदलाचे एक विमान रनवेवरून घसरल्याने त्याचा परिणाम इतर विमानांच्या उड्डाणांवर झाला आहे.  त्यामुळे अनेक प्रवाशांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. रात्री उशिरा विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
 
 
बेंगळुरुच्या येलाहानाका एयर फोर्स स्टेशनवर जाण्यासाठी सज्ज असलेले एएन ३२ हे विमान टेकऑफ घेण्यासाठी मुंबई विमानतळाच्या रनवेवर धावायला लागले. पण ११.३२च्या सुमारास ते रनवेवरून घसरले. लगेच विमानचालकाने हे विमान रोखले त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळपर्यंत हे विमान रनवेवरून बाहेर काढण्यात आले नव्हते.तांत्रिक बिघाडामुळे हे विमान घसरले असल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे. लगेच हा रनवे बंद करण्यात आला आहे. सर्व विमानं आता तुलनेने छोट्या असलेल्या कुर्ला-अंधेरी रनवेवर वळवण्यात आली आहेत. यामुळे ५० विमानांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. विमानांच्या उड्डाणालाही बराच वेळ लागतो आहे.