तोतया पोलिसांनी घातला ५० हजारांचा गंडा
   दिनांक :08-May-2019
हिंगणघाट: दोन इसमांनी पोलीस असल्याची बतावनी करुन शहरातील नंदोरी चौक येथील प्रतिष्ठित नागरिक दामोदर निखाडे यांच्या सुमारे पंचावन्न हजार किमतीच्या मुद्देमालाची लूट केली.

 
 
सोमवार दि ५ रोजी श्रीयुत दामोदर पांडुरंग निखाड़े हे सायंकाळी आठवड़ी बाजारात भाजी आणावयास गेले असता दोन इसमांनी पोलीस असल्याची बतावनी करत त्यांना थांबविले,अवैध अमली पदार्थ पकडण्यासाठी तपासणी सुरु असल्याचे सांगून त्याचे दोन सोन्याच्या आंगठया व हातातील घड्याळ हिस्कावून घेतले.
मोहिनी टाकल्याप्रमाणे मला भ्रम झाल्याने काही वेळ काहीच सूचले नाही, परंतु नंतर मला माझी फसवणूक झाल्याचे लक्षात आले, अशी माहिती श्री निखाड़े यांनी दिली.
. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार केली असुंन या तोतया पोलिसांचा अजूनतरी सुगावा लागला नाही.