वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेतील मराठा कोट्यासंबंधी निर्णय उद्या
   दिनांक :08-May-2019
 मुंबई: मराठा आरक्षण लागू झाल्यास वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशात खुल्या वर्गातील किती विद्यार्थ्यांना फटका बसणार? मराठा समाजातील किती विद्यार्थ्यांना वगळल्याचा तोटा सहन करावा लागणार, असा प्रश्न उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारची सुनावणी थांबवली. तसेच, ही माहिती उद्या, गुरुवारच्या सुनावणीत सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. न्या. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे या संबंधी सुनावणी सुरू आहे.

 
 
मराठा आरक्षण आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्याक्रमाच्या प्रवेशासंदर्भातील सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत 16 टक्के मराठा कोट्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. या स्थगितीला राज्य सरकार आणि समर्थक पक्षकारांतर्फे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली, तर समर्थक याचिकाकर्ता विनोद पाटील यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील परिंवदर पटवारिया यांनी बाजू मांडली.