Met gala 2019; प्रियांकाच्या गाऊनची किंमत ऐकून थक्क व्हाल..!!
   दिनांक :08-May-2019
प्रियंका चोप्राचे ‘मेट गाला 2019’मधील लूक ट्रोल होत असून तिच्यावर अनेक मीम्स सोशल मीडियावर पाहायला मिळाले. कुणी तिच्या केसांची तुलना वीरप्पनच्या मिशांशी केली, कुणी तिला विक्रम वेताळ म्हटले. एकंदर काय तर प्रियंकाचा हा लूक पाहून सारेच जण चक्रावून गेले. तिच्या आऊटफिटचीही खिल्ली उडवली गेली. तिच्या या लूकपेक्षा, या लूकवरच्या मजेदार भन्नाट मीम्सनी लोकांचे अधिक मनोरंजन केले. पण प्रियंकाच्या ज्या आऊटफिटची खिल्ली उडवली गेली, त्याची किंमत तुम्हाला ठाऊक आहे?
सॉफ्ट पेस्टल गाऊनमध्ये प्रियंकाने पिंक कार्पेटवर एन्ट्री घेतली. या थाई हाय स्लिट गाऊनवर पिंक आणि येलो फेदर लागलेले होते. या गाऊनमध्ये प्रियंका कमालीची सुंदर दिसत होती. पण या गाऊनसोबत प्रियंकाने कॅरी केलेल्या हेअरस्टाईल आणि मेकअपने मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. प्रियंकाच्या हेअरस्टाईलिस्टने तिला ‘अफ्रिकन कर्ल’ स्टाईलची हेअरस्टाईल दिली. यावर एक क्राऊनही चढवला. ‘मेट गाला’च्या यंदाच्या थीमनुसार प्रियंकाचा हा लूक एकदम परफेक्ट होता. पण देसी गर्लवर हा लूक अनेकांना रूचला नाही.
 
प्रियंका चोप्राच्या या गाऊनची किंमत ही तब्बल 45 लाख रुपये एवढी असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच प्रियंकाने जे डायमंड इयरिंग घातले आहेत त्याची किंमतही सुमारे 10 लाख रुपये एवढी आहे.