कारच्या अपघातात 1 ठार, एक गंभीर

    दिनांक :08-May-2019
 
सेलू: सेलू कडून येलाडकेळी कडे जात असलेल्या एका भरधाव एक्स. यु. वी .500 या कारने रस्त्याने जात असलेल्या दोन इसमास उडविले, यात होमदेव ठाकरे यांचा मृत्यू झाला असून एक गंभीर झाला आहे. हा अपघात आज 8 रोजी दुपारी 3 च्या सुमारास मौजा रेहकी येथील बस स्थानकावर झाला.
मृतकाचे नाव होमदेव चफतराव ठाकरे वय 46 रा.रेहकी असे असून जखमींचे नाव मारोती शामराव टूले वय 65 रा . रेहकी असे आहे.
 

 
 
यात दोघेही गंभीर जखमी झाले .जखमींना दवाखान्यात नेत असताना होमदेव ठाकरे यांचा रस्त्यातच मृत्यू झाला .कारची धडक एवढी जबरदस्त होती की, रस्त्यावरील विद्युत पोल खाली कोसळला या प्रकरणी सेलू पोलिसांनी नोंद घेतली असून आरोपी अभय सोमनकार याला अटक केली आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे करीत आहे. 
mh 34 AM 7500 ही अभय सोमनकार रा वर्धा हा सेलू कडून येलाकेळी कडे घेऊन जात होता. दरम्यान रेहकी येथे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले याच वेळी रस्त्याने जात असलेले मृतक होमदेव ठाकरे व मारोती टूले यांना जोरदार धडक दिली