पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंतने 'या' महान खेळाडूला केले प्रभावित

    दिनांक :08-May-2019
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात दिल्ली कॅपिटल्स संघाने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे २०१२ नंतर प्रथमच दिल्लीच्या संघाने प्लेऑफच्या गटात प्रवेश केला आहे. क्रिकेट विश्वातील महान फलंदाज सर व्हिव्हियन रिचर्ड्सही दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाने प्रभावित झाले आहेत.
 
 
 
आयपीएलच्या प्लेऑफ फेरीतील हा पहिला बादफेरीचा सामना आहे. बुधवारी दिल्ली किंवा सनरायजर्स हैदराबादपैकी एक संघ बाहेर जाईल. या मोसमात दोन्ही संघांचा खेळ पाहणे एक आनंददायी अनुभव होता. पण दिल्लीचा खेळ जास्त प्रभावशाली वाटला असे व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी म्हटले आहे.
 
व्हिव्हियन रिचर्ड्स दिल्लीचे तरुण फलंदाज पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंतच्या खेळाने प्रभावित झाले आहेत. या दोघांच्या आक्रमक फलंदाजीने दिल्लीला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावली असे रिचर्ड्स यांनी म्हटले आहे.
सात वर्षानंतर प्लेऑफ मध्ये खेळणे हा दिल्लीसाठी नवीन अनुभव असेल. या मोसमात दिल्लीचा खेळ पाहणे एक आनंददायी अनुभव होता. पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत यांनी चांगले फटके मारले. त्यांच्या खेळावरुन ते प्रतिस्पर्धी संघाच्या दबावाखाली आहेत असे वाटले नाही. सतत जिंकण्यासाठी ही गोष्ट आवश्यक असते असे व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी म्हटले आहे.