वन विभागाच्या गलथान कारभारामुळे वन्यजीव प्राण्यांचा जीव टांगणीला

    दिनांक :08-May-2019
पशुपक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करन्याची मागणी
 
मंगरुळपीर,
मंगरुळपीर तालुक्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत पशु-पक्षांना पाण्याच्या शोधात जीव गमवावे लागत आहेत. त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गौरवकुमार इंगळे यांनी केली आहे. 

 
 
सध्या वाशिम जिल्ह्यातील जनता भिषण दुष्काळाचा सामना करत असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशातच मंगरुळपीर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यात मोठ्या प्रमाणात मुक्या पशू पक्षी, चिमणी, मोर, हरीण, काळवीट, आदी पशु पक्षी वनविभागाच्या जगंली वनामध्ये आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था केली जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्राणी पाणी नसल्यामुळे मृत्यू पावत आहे.
 
माणूस पाणी मागू शकतो परंतु प्राणी पाणी मागू शकत नाही. पशुपक्षांसाठी तर पाणी मिळणे दुर्मीळ झालेले असल्यामुळे पाण्याच्या शोधात भटकणाच्या पशुपक्षांवर कुत्र्यांचे हल्ले किंवा रस्ता ओलांडताना वाहनाची धडक बसून त्यांचा मृत्यु होत आहे. वनविभागाकडून जर शेतांमध्ये पाणवठे तयार केले तर पशुपक्षांवर पाण्यासाठी रस्त्यावर येण्याची वेळ येणार नाही. वन विभागाच्या गलथान कारभारामुळे वन्यजीव प्राण्यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे वनविभागाने त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते गौरव कुमार ईंगळे यांनी केली आहे.