फॅशन पेस्टल कलर्सची

    दिनांक :09-May-2019
सृष्टी परचाके 
फॅशनिस्टा :  
उन्हाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी हटके रंगाचा वापर करावा. सध्या पेस्टल रंग ट्रेंडिंगमध्ये असून या रंगाचे आऊटफिट परिधान केल्यास थंडावा मिळतो. बदलत्या ऋतू प्रमाणे फॅशनमध्ये बदल केले पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसांत घामाच्या धारा सुरू होतात, त्यात जाड कापडाचे कपडे असतील तर अंगाची अक्षरशः लाही-लाही होते आणि त्यामुळे दुपारच्या वेळचा उकाडा तर सहन होण्यापलीकडे असतो. प्रत्येकाला पेस्टल रंग शोभून दिसत असून या रंगामध्ये अनेक आऊटफिट बाजारात उपलब्ध आहे. तरुणांसाठी पेस्टल रंग उत्तम असून सध्या प्रिंटेड पॅटर्न ट्रेंडिंगमध्ये आहे. हटके आणि स्टायलिश लूकसाठी पेस्टल रंगाचे ब्लेझर आणि शर्ट नक्की परिधान करावे. कपड्यांसह फुटवेयरमध्येही पेस्टल रंग उपलब्ध आहे. तसेच पेस्टल रंगाचे पातळ कपड्याचे ऊटफिट उन्हाळ्यासाठी उत्तम आहे. 

 
 
शर्ट : 
उन्हाळ्यात पेस्टल रंगाचे टी-शर्ट तरुणांसाठी उत्तम आहे. फिक्कट हिरव्या आणि गुलाबी रंगाचे शर्ट प्रत्येक प्रसंगात शोभून दिसत असून या शर्टखाली पांढर्‍या रंगाची फॉर्मल पॅन्ट स्टायलिश लूक देते. तसेच पारंपरिक वेषभूषेमध्ये कुर्ता परिधान करावा. सध्या पेस्टल रंगाचे प्रिंटेड कुर्ते तरुणांमध्ये प्रसिद्ध आहे. वेगळा लूक करायचा असल्यास पेस्टल रंगाचे प्रिंटेड कुर्ते निवडावे. ॲक्वा ग्रीन रंगाचे आऊटफिट उन्हाळ्यासाठी उत्तम आहे. तसेच फॉर्मल लूकसाठी ॲक्वा ग्रीन रंगाचे ब्लेझर पांढर्‍या रंगाच्या शर्टावर परिधान केल्यास क्लासी लूक मिळतो. प्रिंटेड शर्टमध्ये चेक्स, ब्लॉक्स आणि लाईनींग सारखे पर्याय उपलब्ध आहेत. कॉलेजमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी फिक्कट गुलाबी किंवा पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान करावा.
 
ब्लेझर :
फॉर्मल लूकसाठी तरुण ब्लेझरची निवड करतात मात्र उन्हाळ्यात जाड कपड्याचे ब्लेझर परिधान करणे टाळावे. लेनिन किंवा कॉटनचे ब्लेझर निवडले असल्यास यामुळे गर्मीचा त्रास होत नाही. फिक्कट जांभळा आणि लाल रंगाचे ब्लेझरसुद्धा फॉर्मल म्हणून परिधान करता येते. पार्टी किंवा कार्यक्रमात ब्लेझर परिधान करायचे असल्यास हटके रंगाचे निवड करावे. सध्या मल्टी-रंगाचे ट्रेण्ड जोरात आहे. मल्टी-रंगाच्या ब्लेझरमध्ये एकापेक्षा जास्त रंगाचे वापर केले जाते. उन्हाळ्यात लेयर जसे जॅकेट वर जॅकेट किंवा शर्ट वर शर्ट परिधान करणे टाळावे.
 
फुटवेयर्स :
स्नीकर्समध्ये पेस्टल रंग उपलब्ध आहे. हे स्नीकर्स फॉर्मल आऊटफिटवरही शोभून दिसतात.
टिप्स : पेस्टल रंग वापरायचे नसल्यास, तुम्ही सामान्य रंग आणि पेस्टल रंगाच्या कपड्यांचे जोड वापरू शकता. सामान्य रंग अधिक लक्ष वेधून घेईल, पेस्टल रंगामध्ये आपल्याला अस्वस्थता जाणवणार नाही. पेस्टल रंग सौम्य असतात, ते त्यांच्या उज्ज्वल रंगापेक्षा अधिक प्रकारांमध्ये असतात. यामुळे उन्हाळ्यात गर्मी जाणवत नाही. एकाच आऊटफिटमध्ये अनेक पेस्टल रंगाचे कपडे परिधान करणे टाळावे.
 
निऑन गुलाबी शर्ट अनेकदा ट्रेण्डमध्ये असतात. पेस्टल्स रंग व फॅब्रिक अधिक शांत असल्याने ते विविध प्रकारच्या स्टाईलमध्ये आणि कोणत्याही स्किन टोनला जुळणारे असतात.
 
स्किन टोनचे प्रकार : स्किन टोन म्हणजे त्वचेचा रंग, जो प्रामुख्याने मेलेनिनच्या प्रमाणाद्वारे निर्धारित केला जातो. जास्त प्रमाणात त्वचा गडद असणे; त्वचा उजळ असणे इ. प्रत्येकाची त्वचा आणि त्वचेचा रंग भिन्न असतो. यालाच स्किन टोन असे म्हणतात. या त्वचेच्या टोन नुसार पेस्टल रंगाची निवड करणे गरजेचे असते.