कामाख्या एक्स्प्रेसला भीषण आग
   दिनांक :09-May-2019
उत्तर प्रदेशधील मिर्झापूरमध्ये कामाख्या एक्स्प्रेसला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली आहे. या भीषण आगीचे धुराचे लोट डब्यांमध्ये घुसल्यामुळे प्रवाशांमध्ये धावपळ झाली. या घटनेची रेल्‍वे चालकाने तातडीने नियंत्रण कक्षाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्‍निशमनदालच्या जवानांनी घटनास्‍थळी धाव घेत आग विझविली.
 

 
गुरुवारी सकाळी मिर्झापूरच्या कैलहट रेल्वे स्थानकाच्या जवळून कामाख्या एक्स्प्रेस जात होती. यावेळी रेल्‍वेच्या जनरेटर बोगीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली. घटना लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत आग लागलेल्‍या बोगीपासून अन्य डबे बाजुला केले. त्‍यामुळे पुढील अनर्थ टळला.
 
 
 
दरम्‍यान, या आगीत सुदैवाने कोणीतीही जिवीतहानी झाली नाही. परंतु, दिल्ली-हावडा रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.