आयुष्मानच्या 'या' चित्रपटाचा बनणार रिमेक
   दिनांक :09-May-2019
आयुष्यमान खुराणा आणि भूमि पेडणेकर यांच्या शुभ मंगल सावधान सिनेमा सुपरहिट झाला होता. चित्रपटातील आयुष्मान आणि भूमीची जोडी सुद्धा प्रेक्षकांना पसंत पडली होती. आता लवकरच शुभ मंगल सावधानचा रिमेक आपलायला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात समलैंगिकतेवर भाष्य करण्यात येणार आहे.  सध्या या सिनेमाचे कास्टिंग सुरु आहे. पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शुभ मंगल ज्यादा सावधान चे निर्मिती हितेश केवल्या करणार आहेत.
 
 
याशिवायदेखील आयुष्यमान आणि भूमी दिग्दर्शक अमर कौशिकचा आगामी चित्रपट 'बाला'मध्ये दिसणार आहेत. हे दोघे खूप चांगले मित्र असून ते या चित्रपटाच्या प्रवासा सुरूवात करण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
याबाबत आयुषमान म्हणाला की, 'आमच्या दोघांचे विचार एकमेकांशी खूप जुळतात. त्यामुळे आमचे चांगले जमते. मला आनंद आहे की भूमी व माझ्या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. आता सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर पुढील प्रोजेक्टची जबाबदारी आणखीन वाढते. मला आशा आहे की या चित्रपटाची स्क्रीप्ट जगभरातील लोकांना आवडेल. भूमी टॅॅलेंटेड अभिनेत्री असून तिच्यासोबत काम करायला मजा येते. आम्ही आधीच लोकांना पाहण्यासाठी नवीन व अनोख्या गोष्टी दिल्या आहेत. आपल्या कथानकामुळे बाला चित्रपट देखील रसिकांना आवडेल आणि प्रेक्षक आमच्या तिसऱ्या सिनेमाला देखील खूप प्रेम देतील अशी आशा आहे.'