अमेरिकेने इराणवर लावले नवे प्रतिबंध
   दिनांक :09-May-2019
अमेरिकेने बुधवारी इराणवर नवे प्रवतिबंध लावले. यामध्ये लोखंड, स्टील, ॲल्युमिनिअम आणि तांब्याच्या निर्यातीवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. अमेरिकेच्या या प्रतिबंधांनंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
 
 
लोखंड, स्टील, ॲल्युमिनिअम आणि तांब्याची निर्यात इराणने बंद करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. नॉन पेट्रोलिअम पदार्थांनंतर इराणला सर्वाधिक महसूल याच धातूंच्या निर्यातीतून मिळतो. त्यामुळे धातूंची निर्यात करुन इराणचा महसूल कमी करणे हा यामागील उद्देश असल्याचे सांगत अन्य देशांनीही इराणकडून निर्यात होणाऱ्या या धातूंना आपल्या बंदरांवर उतरू देऊ नये, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
 
दरम्यान, या धातूंच्या निर्यातीतून मिळणारा महसूल शास्त्रांच्या खरेदी, दहशतवादी गटांना मदत करण्यासाठी आणि सैन्यदलाच्या विस्तारासाठी वापर केला जाऊ शकतो, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. इराणने बुधवारी 2015 सालच्या अण्विक करारातील काही अटी मान्य करण्यास नकार दिला. त्यानंतर अमेरिकेने नवे निर्बंध लावण्याची घोषणा केली.