IPL2019: असा बाद झाला अमित मिश्रा !

    दिनांक :09-May-2019
आयपीएलच्या प्लेऑफ गटातील बादफेरीच्या सामन्यात अमित मिश्रा वेगळया पद्धतीने बाद झाला. धाव घेताना खेळपट्टीवर क्षेत्ररक्षकाला अडथळा निर्माण केल्याबद्दल त्याला बाद ठरवण्यात आले. अशा प्रकारे बाद होणारा या मोसमातील तो पहिला फलंदाज ठरला आहे.

 
 
दिल्लीच्या डावातील शेवटच्या षटकात ही घटना घडली. अमित मिश्रा धाव घेताना बरोबर खेळपट्टीच्या मधोमध होता. बाद करण्यासाठी फेकलेला चेंडू त्याच्या शरीराला लागला. अमित मिश्राचा स्टम्पच्या दिशेने जाणारा चेंडू अडवण्याचा प्रयत्न स्पष्टपणे कळत होता. अमित मिश्राला बाद ठरवताना पंचही गोंधळलेले होते. हैदराबादच्या संघाने अडथळा निर्माण केल्याबद्दल त्याला बाद ठरवण्याचे अपील केले होते. पण पंचांनी झेलबादचे अपील समजून त्याला नाबाद ठरवले.
 
पण हैदराबादने क्षेत्ररक्षकाला अडथळा निर्माण केल्याबद्दल बाद ठरवण्याचे अपील केले. अमित मिश्राने एकेरी धाव घेताना दिशा बदलल्याचे स्पष्टपणे दिसत होते. चेंडू त्याच्या हाताला लागला होता. अखेर पंचांनी त्याला अडथळा निर्माण केल्याबद्दल बाद ठरवले.