अनुप सोनी दिसणार मराठी चित्रपटात !
   दिनांक :09-May-2019
छोट्या पडद्यावर अनुप सोनी यांनी अनेक वर्ष क्राईम पेट्रोल या मालिकेचे सूत्रसंचालन केले आहे बालिका वधू मध्ये त्यांने भैरव धरमवीर सिंगची भूमिका साकारली होती. मालिकेतील इतर भूमिकांप्रमाणे ही भूमिकाही रसिकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. टीव्ही मालिकांसह त्याने अनेक हिंदी सिनेमातही विविधांगी भूमिकांमध्ये तो झळकला आहे. आता लवकरच अनुप सोनी मराठी सिनेमात पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' सिनेमात तो दिसणार आहे. यात तो एका नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत.
 

 
कुशाग्र बुद्धिमत्ता, भौगोलिक तथा मानसशास्त्रीय उत्तम समज, दूरदृष्टी, कालसुसंगत युद्धनीती यांच्या बळावर महाराजांनी भल्या-भल्या शत्रूंवर मोठ्या चलाखीने चढाया केल्या आणि प्रत्येक मोहिम फत्ते केली. आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत 'फत्तेशिकस्त' हा सिनेमा शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या अशाच एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे. अलीकडेच भारतीय लष्कराने केलेल्या थरारक सर्जिकल स्ट्राईकची पाळंमुळं ही शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीमध्येच रुजलेली आहेत, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 'फत्तेशिकस्त' या आगामी महत्त्वाकांक्षी चित्रपटाद्वारा आपल्याला अशाच एका अतुलनीय लढ्याचे साक्षीदार होण्याची संधी लाभणार आहे.
अनुप सोनीसह यात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर यांसारख्या मातब्बर कलाकार यात मुख्य भूमिकेत आहेत.