जंगली कुत्र्यांच्या हल्ल्यात अस्वल ठार
   दिनांक :09-May-2019
 
 
वर्धा: सेलु तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या न्यु बोर मधील कक्ष क्र. २८३ मध्ये आज  सकाळी अस्वलीच्या चार ते पाच महिन्याच्या मादी शावकाचा जंगली कुत्र्याच्या हल्ल्यात झूंज देत मुत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. यावरुन जंगलातील वन्यप्राणी किती सुरक्षित आहे. यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
 
 
 
पाण्याच्या शोधात भटकंती करित न्यु बोर व प्रादेशिक सिमेलगत असलेल्या न्यु बोरच्या कक्ष क्र. २८३ मध्ये असलेल्या वन तलावात तहानेने व्याकुळ पोहचलेल्या अस्वलीच्या शावकावर खुंखार अशा जंगली कुत्र्यांनी अचानक हल्ला चढविल्याने स्वतःचा बचाव करण्यात अकार्यक्षम ठरलेल्या अस्वल शावकाला जिवानेच मुकावे लागले असल्याची माहिती न्यू बोर व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी लूचे यांनी दिली. सदर घटना आज दि.९ मे रोज गुरवार चे सकाळी घडली असुन याची माहिती दुपारी उघडकीस आल्याने वन विभागाने दखल घेत घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.माहिती लिहे पर्यंत शवविच्छेदन होने बाकी होते.