पक्ष्यांना वाचवण्यासाठी टीव्ही अभिनेत्रीने घेतला पुढाकार
   दिनांक :09-May-2019
पोळून काढणाऱ्या कडाक्याच्या उन्हात पोटाची खळगी भरण्यासाठी व पाण्याची तहान भागवण्यासाठी पक्ष्यांची मात्र अविरत धडपड सुरु असते. या धडपडीला सुसह्य करुन त्यांच्या जिवाला थोडासा गारवा देण्यासाठी गरज आहे मूठभर धान्याची व वाटीभर पाण्याची. यासाठी अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशीने पुढाकार घेतला आहे.
 
 
 
दिगांगनाने तिच्या घराच्या बालकनीमध्येच पक्ष्यांसाठी वेगळी जागा बनवली आहे. उन्हाच्या प्रखर झळांमध्ये पक्ष्यांची जगण्यासाठीची ससेहोलपट थांबवण्यासाठी तिने छोटंस पाऊल उचललं आहे. त्याचसोबत तिने तिच्या चाहत्यांनाही पक्ष्यांची मदत करण्यास आवाहन केलं आहे.
 
 
 
‘आजकाल पक्ष्यांची विशेषकरून चिमण्यांची संख्या खूप कमी झाली आहे. उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी आवर्जून बालकनीमध्ये किंवा घराच्या खिडकीत पाणी ठेवा. तुम्ही पर्यावरणाची काळजी घेतली तर पर्यावरण तुमची काळजी घेईल,’ असं तिने म्हटलं.