हार्दिकवर दबाव टाकणे योग्य नाही: कपिल देव

    दिनांक :09-May-2019
 विराट कोहलीचा भारतीय संघ विश्वचषक विजयाचा प्रबळ दावेदार मानला जातोय.  स्पर्धेसाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा बीसीसीआयच्या निवड समितीने याआधीच केली आहे. हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये चांगलाच फॉर्मात आहे. मात्र विश्वचषकासाठी त्याच्यावर दबाव टाकणं योग्य ठरणार नाही असं मत, माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केलं आहे.
 
 
हार्दिक पांड्याकडून असलेल्या अपेक्षा आणि त्याच्या कामगिरीबद्दल प्रश्न विचारला असता कपिल देव म्हणाले, “हार्दिकवर दबाव टाकणं योग्य ठरणार नाही. तो तरुण खेळाडू आहे आणि त्याला त्याच्या नैसर्गिक शैलीनुसार खेळू द्यायला हवं. त्याची कोणासोबतही तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही. तो एक चांगला गोलंदाज आहे आणि इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या त्याच्यासाठी फायदेशीर ठरतील.” याचसोबत बुमराह आणि शमी यांची भूमिकाही महत्वाची असेल असं कपिल देव म्हणाले.