सहा महिन्यांनंतर उघडले केदारनाथ मंदिराचे दार
   दिनांक :09-May-2019
चारधाम यात्रेतील केदारनाथ मंदिर आज गुरूवारपासून भक्तांसाठी खुलं करण्यात आले आहे. मंदिराचा दरवाजा सहा महिन्यांनी उघडण्यात आला आहे. मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर पुजाऱ्यांनी विधीवत पूजा केली. हजारो भक्तांच्या उपस्थितीत केदारनाथाला जलाभिषेक, रुद्राभिषेक संपन्न झाला आहे.
 
 
सात तारखेला गंगोत्री आणि यमनोत्रीची दारे खुली झाल्यापासून चार धामच्या यात्रेला सुरूवात झाली आहे. ही यात्रा सहा महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे. शुक्रावारी बद्रीनाथ मंदिरही भक्तांसाठी खुलं होणार आहे. चार धाम मंदिरांची दारे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सहा महिन्यासाठी बंद केली जातात. एप्रिल-मे दरम्यान पुन्हा उघडली जातात. हिमवादळामुळे यात्रेच्या मार्गावर बर्फाची चादर पडली आहे.
 
 
 
 
उन्हाळ्यात उत्तराखंडमध्ये चार धामच्या (गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ) यात्रेला सुरूवात होते. या चार स्थळाला हिंदू संस्कृतीत पवित्र मानले जाते. गंगा नदीचा उगम गंगोत्री आणि यमुना नदीचा उगम यमुनोत्री हे दोन्ही उत्तर काशी जिल्ह्यामध्ये आहे.