चाहत्याने स्वराला म्हटले 'आएगा तो मोदीही'
   दिनांक :09-May-2019
रोकठोक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत येणारी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहे. यावेळी स्वराने निवडणुकीसंदर्भातले तिचे विचारही परखडपणे मांडल्याचं पाहायला मिळालं. प्रचाराच्या रणधुमाळी दरम्यान स्वराला विमानतळावर एक चाहता भेटला. या चाहत्याने स्वरासोबत एक व्हिडिओ काढून तिला चांगलंच डिचवल्याचं समोर आलं आहे. या चाहत्याने केलेल्या या कृतीमुळे स्वराही आश्चर्यचकीत झाली. या चाहत्यासोबतचा व्हिडिओ स्वराने ट्विटरवर शेअर केला असून सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
 
 
स्वराला विमानतळावर पाहिल्यानंतर एक चाहता तिच्या दिशेने आला आणि त्याने स्वरासोबत फोटो काढण्याची विनंती केली. मात्र या चाहत्याने फोटो काढण्याऐवजी तिच्यासोबत एक व्हिडिओ काढला. हा चाहता इथपर्यंतच न थांबता त्याने “मॅडम, आएगा तो मोदीही” असं म्हणत स्वराला डिवचलं. परंतु चाहत्याचा हा प्रकार पाहिल्यानंतर स्वरा चांगलीच संतापली आहे. तिने या चाहत्याचा व्हिडिओ शेअर करत त्याला खडे बोल सुनावले आहेत.