'दीदींनी माझ्या मुस्कटात मारली तरी तो माझ्यासाठी आशीर्वाद'
   दिनांक :09-May-2019
पुरुलिया,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुरुलिया येथील सभेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. दीदींनी माझ्या मुस्कटात मारली तरी तो माझ्यासाठी आशीर्वाद असेल, असं मोदी म्हणाले.
 
 
मोदी यांनी पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे प्रचार सभा घेतली. त्यात त्यांनी ममता बॅनर्जींवर हल्ला चढवला. 'मला सांगितलं गेलं की दीदींना मोदींच्या कानाखाली मारायची आहे. ममता दीदी, मी तर तुम्हाला दीदी म्हणतो. तुमचा आदर करतो. तुम्ही मुस्कटात मारली तरी तो माझ्यासाठी आशीर्वाद असेल. तेही सहन करीन,' असं म्हणत मोदींनी ममतांवर प्रतिहल्ला केला.