'हाऊसफुल्ल ४' मध्ये दिसणार 'हा' कलाकार
   दिनांक :09-May-2019
'हाऊसफुल्ल ४' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, राणा डग्गुबत्ती, क्रिती सनॉन, पूजा हेगडे अशी एकापेक्षा एक तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. पण चित्रपटाच्या या टीममध्ये आता आणखी एका महत्त्वपूर्ण नावाचा समावेश झाला आहे. हे नाव आहे नवाजुद्दीन सिद्दीकी. या कॉमेडी चित्रपटात नवाजुद्दीन झळकणार असल्याची माहिती समोर येत आहे.
 

 
 
नवाजुद्दीन मे महिन्याच्या अखेरीस शूटिंगला सुरुवात करणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटातील एका गाण्यात तो झळकणार आहे. एका वृत्तानुसार, नवाजुद्दीन यामध्ये एका बाबाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील सहा अभिनेते आणि ५०० बॅकग्राऊंड डान्सर्ससोबत नवाज या गाण्यात झळकणार आहे.
 

 
 
तब्बल पाच वर्षांनंतर नवाजुद्दीन आणि निर्माता साजिद नाडियादवाला एकत्र काम करणार आहेत. याआधी सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘किक’ चित्रपटात त्याने साजिदसोबत काम केलं होतं. ‘हाऊसफुल ४’मध्ये नवाजुद्दीनला एका बाबाच्या भूमिकेत पाहण्यास नक्कीच औत्सुक्याचं ठरेल.