चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार; ४१ जणांचा मृत्यू
   दिनांक :09-May-2019
भुवनेश्वर,
 
फनी या चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार माजवला. या चक्रीवादळात आतापर्यंत 41 जणांना जीव गमवावा लागला आहे. ओडिशातील पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडले आहेत. वीज पूरवठा खंडीत झाला आहे. माहिती व जनसंपर्क विभागाने बुधवारी (8 मे) फनी चक्रीवादळातील मृतांचा अधिकृत आकडा जाहीर केला आहे.
 
 
फनी या चक्रीवादळाचा फटका 1 कोटी 50 लाख नागरिकांना बसला आहे. तसेच ओडिशातील अनेक भागात वीजपुरवठा खंडीत आहे. सरकारकडून 12 मे पर्यंत वीजपूरवठा पूर्ववत होईल असे आश्वासन देण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे पुरी, अंगुल, मयूरगंज, केंद्रपाडा या भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (6 मे) फनी वादळामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. फनी वादळामुळे तडाखा बसलेल्या जागांची हवाई पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेलिकॉप्टरमधून केली. फनी वादळाच्या तडाख्यामधून सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 हजार कोटींची मदत तात्काळ जाहीर केली आहे.