ऋषभ पंत युवा खेळाडूंमध्ये सर्वोत्तम फिनिशर

    दिनांक :09-May-2019
दिल्लीने सामन्यात हैदराबादवर २ गडी राखून मात केली आणि क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश केला. सलामीवीर पृथ्वी शॉने झळकावलेलं अर्धशतक आणि त्याला मधल्या फळीत ऋषभ पंतने फटकेबाजी करत दिलेली साथ या जोरावर दिल्लीने सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात दिल्लीकडून शॉचे अर्धशतक झाले, पण सामन्याला कलाटणी ऋषभ पंत खेळीमुळे मिळाली.
 
 
ऋषभ पंतने मोक्याच्या वेळी फटकेबाजी केली. त्याने २१ चेंडूत ४९ धावा ठोकल्या. या खेळीत २ चौकार आणि तब्बल ५ षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीवर अनेकांनी स्तुतीसुमने उधळली. यात त्याचा सहकारी पृथ्वी शॉदेखील मागे राहिला नाही. ऋषभ पंत हा नव्या दमाच्या युवा खेळाडूंमध्ये सर्वोत्तम फिनिशर आहे, असे म्हणत त्याने ऋषभची प्रशंसा केली.
तो म्हणाला की टी २०१ सामन्यांमध्ये खेळताना खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळ मिळत नाही. अशा सामन्यांमध्ये खेळताना खूप दडपण असते. आम्ही सामना जिंकावा म्हणून मी मनापासून प्रार्थना करत होतो. ऋषभ पंतने तुफानी खेळी केली. त्याने खरंच उत्तम कामगिरी केली. आम्हा नव्या आणि युवा क्रिकेटपटूमध्ये तो सर्वोत्तम फिनिशर आहे.
ऋषभ पंत जेव्हा खळायला मैदानावर उतरतो, तेव्हा तो सामना आमच्यासाठी खुला होतो. IPL मधील त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. त्याने अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. दुर्दैवाने ऋषभ पंतला सामन्यातील विजयी फटका मारता आला नाही. त्याआधीच तो बाद झाला. पण तसे असले तरी किमो पॉलने ती औपचारिकता पूर्ण केली, असेही त्याने नमूद केले.