शेअर बाजारात सातव्या दिवशीही घसरण
   दिनांक :09-May-2019
मुंबई, 
 
मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात आज गुरुवारी पुन्हा एकदा घसरण झाली. घसरणीचा हा सलग सातवा दिवस ठरला आहे. अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाचे सावट आजही शेअर बाजारावर पाहायला मिळाले.
 

 
 
मुंबई शेअर बाजारात आज सकाळपासूनच घसरणीला सुरुवात झाली होती. त्यानंतर दिवसभरच घसरणीचे सत्र सुरू होते. दुपारच्या सत्रात काही प्रमाणात खरेदी झाल्याने निर्देशांक 37,780.46 अशा उच्चांकावरही गेला होता, पण त्यानंतर पुन्हा गुंतवणूकदारांची नफा कमावण्याची वृत्ती जागी झाली. सायंकाळपर्यंत ही घसरण 230.22 अंकांच्या घरात गेली. दिवसअखेर शेअर बाजाराचा निर्देशांक 37,558.91 या स्तरावर बंद झाला होता.
 
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही 57.65 अंकांची घसरण झाली. दिवसभराच्या व्यवहारानंतर निफ्टी 11,301.80 या स्तरावर बंद झाला.