पब्जीनंतर आता 'या' चॅलेंजची क्रेझ
   दिनांक :09-May-2019
नवी दिल्ली,
 सध्या जगभरात पबजीची क्रेझ पाहायला मिळत आहे. जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. मात्र पबजीनंतर आता सोशल मीडियावर Cockroach Challenge जोरदार व्हायरल होत आहे. खरं तर कॉक्रोच चॅलेंज हे नाव वाचून सुरुवातीला थोडा धक्का बसला असेल किंवा मग ते किळसवाण वाटलं असेल. पण सध्या या चॅलेंजची जगभरात क्रेझ पाहायला मिळत आहे.
 
 
एखाद्या व्यक्तीने सोशल मीडियावर दुसऱ्यांना चॅलेंज दिलं तर ते व्हायरल व्हायला फारसा वेळ लागत नाही. कॉक्रोच चॅलेंजबाबतही तसंच झालं आहे. कोणताही विचार न करता अनेक जण हे चॅलेंज स्विकारत आहेत. या चॅलेंजमध्ये चॅलेंज स्विकारणाऱ्याने आपल्या चेहऱ्यावर झुरळ ठेवून एक सेल्फी काढायचा आहे. त्यानंतर तो सेल्फी फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल नेटवर्कींग साईट्सवर पोस्ट करणं अपेक्षित आहे.
म्यानमारमधील यानगाँग येथे राहणाऱ्या अ‍ॅलेक्स ऑग या तरूणाने 20 एप्रिल रोजी झुरळासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. अ‍ॅलेक्सने चेहऱ्यावर झुरळ ठेवून काढलेला सेल्फी फेसबुकवर अपलोड केला होता. या फोटोसोबत त्याने नवीन चॅलेंज, तुम्ही करू शकता का? असं कॅप्शन लिहिलं होतं. यानंतर हे चॅलेंज सुरू झालं आहे.