अमेरिकन वूमेन्स ओपन गोल्फर आदिती पात्र

    दिनांक :01-Jun-2019
कार्लटन :
भारतीय गोल्फर आदिती अशोक हिने येथे सुरु असलेल्या अमेरिकन वूमेन्स ओपन गोल्फ स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.
 

 
 
आदितीने आपला राऊंड पूर्ण करत 33 वे स्थान मिळविले, मात्र अजूनही अनेक खेळाडू आपला राऊंड पूर्ण करायचे शिल्लक आहे.वादळ वार्‍यामुळे दुपारी सुमारे दोन तास खेळ थांबविण्यात आला होता. जपानच्या मामिको हिगा स्पर्धेची पहिली फेरी पूर्ण करणारी पहिली खेळाडू ठरली. हौशी गोल्फर 19 वर्षीय जिना किम ही पहिली फेरी पूर्ण करणारी तिसरी खेळाडू ठरली.