येथे संडासातल्या पाण्याने तयार होते चटणी

    दिनांक :01-Jun-2019
 
 
 
 
मुंबई : मुंबईचे जीवन अत्यंत धकाधकीचे आहे. भल्या पहाटे कामासाठी निघालेले मुंबईकर भूक लागल्यावर रस्त्यालगतच्या एखाद्या ठेल्यावर इडली चटणी किंवा अश्याच प्रकारचा एखादा नाश्ता करून आपले पोट भरतात. तुम्हीही या पैकी एखादे असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, कारण मुंबईच्या डोबिवली स्टेशन बाहेर एक इडली चटणीवाला चक्क संडासातल्या पाण्याने चटणी बनवतो. या सर्व प्रकारचा एक व्हिडीओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा अत्यंत धक्कादायक प्रकार असून फक्त पैसे कमविण्यासाठी एखाद्याच्या आरोग्याशी खेळल्या जात आहे. स्थानिकांच्या मते हा इडलीवाला डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या बाहेर गेल्या आठ वर्षांपासून इडली चटणीचा ठेला चालवतो आहे. याचाच अर्थ हा सर्व प्रकार किती वर्षांपासून सुरु आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. या आधी अश्याच प्रकारे दूषित पाण्यापासून लिंबू पाणी बनविल्या जात असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. अन्न प्रशासन विभागाचे कायदे धाब्यावर बसवून सर्रास असे ठेले मुंबईत जागो जागी थाटलेले आहेत. लोकांच्या आरोग्याशी होत असलेला हा लाजिरवाणा खेळ प्रशासन फक्त व्हायरल झालेल्या व्हिडीओ मधून पाहत बसणार की यावर काही ठोस कारवाई सुद्धा करणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.