फुटबॉलपटूचे कार अपघातात निधन

    दिनांक :01-Jun-2019
नवी दिल्ली :
आर्सेनल आणि रियाल माद्रिद या नामांकित संघाकडून खेळलेल्या 35 वर्षीय जोस अॅण्टोनियो रेयेस या फुटबॉलपटूचे कार अपघातामध्ये निधन झाले.
 
 
 
सेव्हिला या संघाकडून जोसने फुटबॉल खेळायला सुरुवात केली होती. सेव्हिला या फुटबॉल क्लबनेच जोसचे कार अपघातामध्ये निधन झाल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. जोस याच्या अपघाती मृत्यूमुळे आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.