भारतीय ज्युनियर महिलांची कॅनडावर मात

    दिनांक :01-Jun-2019
डब्लिन,
येथे सुरु असलल्या कॅन्टोर फिट्‌झगेराल्ड 21 वर्षांखालील महिलांच्या आंतरराष्ट्रीय चौरंगी हॉकी स्पर्धेत भारताच्या ज्युनियर महिला संघाने कॅनडावर 2-0 ने शानदार विजय नोंदविला. अतिशय चुरशीच्या या सामन्यात भारतीय संघाने तंत्रशुद्ध खेळाचे प्रदर्शन करत आपला विजय साकार केला.
 

 
 
भारताने दमदार सुरुवात करत कॅनडाच्या संरक्षण फळीवर आपला दबाव कायम राखला. पूर्वार्धातील खेळात भारताला पेनॉल्टी स्ट्रोकची संधी मिळाली, परंतु गगनदीपचे प्रयत्न कॅनडाच्या रॉबिन फ्लेिंमगने फोल ठरविले. त्यानंतरही भारताने आपली आक्रमकता कायम राखली. त्यानंतर लगेच पेनॉल्टी कॉर्नरची संधी मिळाली, मात्र यातही पुन्हा फ्लेिंमगने आव्हान उधळून लावले. दुसर्‍या चरणात कॅनडालाही पहिल्या पेनॉल्टी कॉर्नरची संधी मिळाली, परंतु भारताची गोलरक्षक बिचू देवीने हा गोल सुरेखरीत्या रोखला. आता रविवारी भारताचा सामना आयर्लण्डविरुद्ध होणार आहे.