सामन्यापूर्वी रबाडाने कोहलीला डिवचले

    दिनांक :01-Jun-2019
- टीम इंडियाची जंगल सफारी
लंडन,
आयसीसी विश्वचषक स्पर्धेत आगामी 5 जून रोजी भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. या सामन्याच्या पूर्वतयारीसाठी भारतीय संघ साऊदम्पटन शहरात कसून सराव करत आहे. या सरावातून वेळ काढत टीम इंडियाने जवळच्या परिसरात जंगल सफारीचा आनंद लुटला. बीसीसीआयने टीम इंडियाचे हे खास फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. असे काही सुरळीत सुरु असतानाच दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आफ्रिकेचा प्रमुख गोलंदाज कॅगिसो रबाडाने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत कोहली ‘अपरिपक्व खेळाडू’ असल्याची टीका केली आहे.
 
 
 
अलिकडेच पार पडलेल्या बाराव्या आयपीएल मोसमादरम्यान दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यातील एका प्रसंगाचे उदाहरण देत रबाडाने विराटला डिवचले. गोलंदाजीदरम्यान विराटने रबाडाच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत त्याला चिथावले, मात्र त्याच्या दुसर्‍याच चेंडूवर रबाडाने विराटला चकवले. या प्रसंगावरुन दोघांमध्ये शाब्दीक युद्धही रंगले होते. विराटच्या या वर्तनालाच रबाडाने अपरिपक्वता म्हटले आहे.