मलेशिया 3300 टन प्लॅस्टिक कचरा परत पाठविणार

    दिनांक :01-Jun-2019
पोर्ट क्लांग,
मलेशियाने पुनर्प्रक्रियेसाठी विविध देशांतून येणार्‍या प्लॅस्टिकच्या कचर्‍याविरोधात मोहीम उघडली आहे. देशात पूर्वी आलेला प्लॅस्टिक कचरा मलेशिया आता, त्या देशांना परत करणार आहे. या देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. मलेशियाच्या पर्यावरण मंत्री यिओ बी यिन यांनी ही माहिती वृत्तसंस्थेस दिली. मलेशिया सरकार दुसर्‍यांचा कचरा आपल्या देशात घेणार नाही, असे त्या म्हणाल्या.
 
 
 
ऑस्ट्रेलिया-अमेरिका या सारख्या देशांमधून आलेल्या प्लॅस्टिक कचर्‍याचे कंटेनर पुन्हा त्या देशात परत पाठविण्यात येणार आहे. मलेशियात प्लॅस्टिक कचर्‍यावरील पुनर्प्रक्रिया पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, कॅनडा, चीन, जपान आणि सौदी अरेबिया सारख्या देशांतून प्लॅस्टिक कचर्‍याच्या आयातीवर आता मलेशियाने जोरदार मोहीम उघडली आहे.
 
90 च्या दशकात सुरूवातीला जगाभरातून चीनमध्ये पुनर्प्रक्रियेसाठी प्लॅस्टिक पाठवले जात होते. 2017 चीनने कायदा तयार करून त्यावर प्रतिबंध घातला. पर्यावरण प्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता.