दोन मल्याळी अभिनेत्रींची देहविक्रीच्या व्यवसायातून सुटका

    दिनांक :01-Jun-2019
पुणे: दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमधील निवृत्त डॉक्‍टरकडून हिंदी व मल्याळी अभिनेत्रींकडून देहविक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी पहाटे सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने सापळा रचून त्या अभिनेत्रींना ताब्यात घेतले. त्यानंतर दोनही अभिनेत्रींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
 
 
 
डॉ. सुरेश कुमार सूद (74 , रा. , किंग्ज अपार्टमेंट, मीरा रोड, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे फौजदार अनंत व्यवहारे यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फौजदार अनंत व्यवहारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सुरेश सूद हा दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमधून सेवानिवृत्त झाला आहे. तो मुंबईतील 24 व 25 वर्षांच्या दोन हिंदी आणि मल्याळी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींकडून देहविक्री करून घेत असल्याची माहिती मिळाली. यावरून बंडगार्डन भागातील मंगलदास रोडवरील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये बोगस ग्राहकद्वारे सापळा रचण्यात आला. 10 हजार रुपयांची टोकन अमांऊंट देऊन पुण्यात आणण्यात आले असता त्यांना हॉटेलच्या रुम नंबर 801 व 804 मधून रेस्क्‍यू करण्यात आले. तर दलाल म्हणून काम करणाऱ्या डॉ. सूद याला वेटींगरूममधून अटक करण्यात आली. आरोपी सूद याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.