बिग बॉसच्या घरात रंगणार विकेंडचा डाव

    दिनांक :01-Jun-2019
बिग बॉस मराठीचं दुसरं पर्व सुरू झालंय. पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये वादावादी सुरू झालीय. आठवडाभरात घरातील स्पर्धकांनी केलेल्या वर्तणुकीचा, कामाचा आढावा घेण्याची वेळ आलीय. त्यामुळं आजच्या भागात सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांच्यासोबत विकेंडचा डाव रंगणार आहे.
 
 
गेल्या रविवारपासून बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाला सुरूवात झाली. पहिल्या दिवसापासूनच खमंग चर्चा, भांडणं, वादविवादांना उधाण आलं आहे. आठवडाभरात बिग बॉसच्या घरात काय झालं? कोण चुकलं? कोण बरोबर? यावर आजच्या विकेंडच्या डावात जोरदार चर्चा होणार आहे. या डावासाठी खुद्द मांजरेकर बिग बॉसच्या घरात अवतरणार आहेत. ज्या स्पर्धकांनी चुका केल्या, त्यांना मांजरेकर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळं बिग बॉसच्या घरातील आजचा विकेंडचा डाव कसा रंगतो, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.