नागपूर : पिस्तुलासह कुख्यात गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

    दिनांक :01-Jun-2019
नागपूर : जगनाडे चौक येथील दोन कुख्यात गुन्हेगारांना प्राणघातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ४ च्या पोलीस पथकाने अटक केली आहे. या कुख्यात गुन्हेगारांचे नाव आशुतोष ऊर्फ आशु अवस्थी व  शुभम गौर असे आहे. गुन्हेशाखा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर त्यांनी ही कारवाई केली. गुरुवारी रात्री जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये कुख्यात गुन्हेगार आशुतोष हा त्याचा साथीदार शुभम गौर रा. सिरसपेठसोबत ९७११ क्रमांकाच्या ऑडीकारमध्ये बसला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ऑडी कारमधून एक विदेशी स्टील, ७ जिवंत काडतूस, १ लोखंडी चाकू सापडला. आरोपी एखाद्या गुन्ह्याची योजना आखत होते. पोसिांनी दोघांना अटक करून कारसह इतर वस्तू जप्त केल्या. आशुतोष हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरीसह अनेक गुन्हे दाखल आहेत.