नेपाळच्या पंतप्रधानांचे नरेंद्र मोदींना निमंत्रण

    दिनांक :01-Jun-2019
काठमांडू,
नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेपाळ भेटीचे निमंत्रण दिले आहे. आपल्या नियमित भेटीमुळे द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील, असा विश्वास ओली यांनी व्यक्त केला आहे.
 

 
 
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात बिमस्टेक राष्ट्रसमूहाचे नेते उपस्थित होते. यात ओली यांचाही समावेश होता. नेपाळमध्ये परत गेल्यानंतर त्यांनी लगेच मोदी यांना नेपाळ भेटीचे निमंत्रण पाठविले. दरम्यान, मोदी यांनी त्यांचे निमंत्रण स्वीकारले असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली आहे.