भारतीय हॉकी संघांच्या नवीन जर्सीचे अनावरण

    दिनांक :01-Jun-2019
नवी दिल्ली,
आगामी एफआयएच हॉकी सीरिज फायनल्समध्ये भारतीय पुरुष व महिला हॉकी संघ नवीन जर्सीमध्ये दिसणार आहे. या स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने दोन्ही संघांच्या नवीन जर्सी व सरावासाठीच्या क्रीडा साहित्याचे अनावरण करण्यात आले.
 
 
 
खेळाडूंची जर्सी निळ्या रंगाची असून जर्सीच्या बाहू तसेच खांद्याची बाजूवर भारतीय तिरंगा आहे. पुरुषांची सीरिज फायनल्स भुवनेश्वर येथे 6 ते 15 जूनदरम्यान, तर महिलांची सीरिज फायनल्स जपानच्या हिरोशिमामध्ये 15 जूनपासून होणार आहे.
 

 
 
भारताची जर्सी घालणे अभिमानास्पद वाटते, असे भारतीय कर्णधार मनप्रीत िंसग म्हणाला. ही नवीन जर्सी मला खूपच आवडली, असे महिला संघाची कर्णधार राणी रामपाल म्हणाली.