रोजगार निर्मितीची मला मिळालेली ही उत्तम संधी- गडकरी

    दिनांक :01-Jun-2019
 

 
 
नागपूर : केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीन गडकरी यांचे नागपुरात प्रथमच आगमन झाले. नागपूर विमानतळावर भाजपा कार्यकर्त्यांकडून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. आज नितीन गडकरींनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. देशातील रोजगार वाढावा व बेरोजगारीची समस्या सुटावी या हेतूनेच पंतप्रधानांनी आपल्यावर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपविली असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच रोजगारनिर्मिती करण्याची ही मला मिळालेली उत्तम संधी आहे असे मी मानतो. देशात महामार्गाच्या कडेला १२५ कोटी झाडे लावणार आहे. गंगा शुद्धीकरण संदर्भात अनेक कामे झाली आहेत. मंत्रिमंडळात असलेले नवीन मंत्री ही कामे समोर घेऊन जातील असेही ते म्हणाले.