एकटा जीव सदाशिव- मोनी रॉय

    दिनांक :01-Jun-2019
काही कलाकार वैयक्तिक आयुष्यावर जाहीरपणे बोलू इच्छित नाहीत. अभिनेत्री मौनी रॉय मात्र याला अपवाद आहे. एका कार्यक्रमात मौनीने  तिचे  वैयक्तिक आयुष्य, करिअर आणि नातेसंबंध याबाबत मोकळेपणाने मत मांडले . 'मी आता करिअरमध्ये बुडून गेली आहे असं म्हणण्याइतपत काम करतेय. सध्या मी एकटीच आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर मी खूप आनंदात आनंदात असून सध्या कुठल्याही 'खास' नात्यासाठी माझ्याकडे वेळ नाही', म्हणजेच एकटा जीव सदाशिव असे स्पष्ट मत तिने व्यक्त केले आहे.