आगामी निवडणूक पवार घेत आहेत गांभीर्याने!

    दिनांक :01-Jun-2019
मुंबई: यंदाच्या लोकसभा निवडणूकीतही २०१४ प्रमाणे झालेल्या पराभवाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगलेच गांभीर्य घेतले आहे. पराभवाची कारणमिमांसा करण्याबरोबरच पवार आता पक्षाच्या आमदारांची तसेच पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेणार असून आगामी विधानसभा निवडणूकीची रणनितीही ते  ठरविणार आहेत.
 

 
 
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस महाआघाडीचा दारूण पराभव झाला. कॉंग्रेसला फक्त १ जागेवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला अवघ्या ५ जागा जिंकता आल्या.