ऑगस्टा वेस्टलँड : सुशेन गुप्ताला सशर्त जामीन

    दिनांक :01-Jun-2019
ऑगस्टा वेस्टलँड आर्थिम गैरव्यवहार प्रकरणातील कथित मध्यस्थ सुशेन मोहन गुप्ता यास शनिवारी विशेष न्यायालयाने सर्शत जामीन मंजूर केला. न्यायालयाने सांगितले की, सुशेनला ५ लाख रूपयांचे दोन जामीन पत्र भरावे लागतील.
 
 
 
याशिवाय विशेष न्यायालयाने उपचारासाठी परदेशात जाण्यासाठी राजीव सक्सेना यांच्या अर्जास मंजुरी दिली आहे.
 
 
 
राजीव सक्सेना ऑगस्टा वेस्टलँड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. न्यायालयाने त्यांना ५० लाख रूपयांची मुदत ठेव केलली पावती जमा करण्याचे आदेश दिले आहेत.