सुरेंद्र सिंह हत्येतील पाचव्या आरोपीला अटक

    दिनांक :01-Jun-2019
अमेठी,
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय असलेले अमेठीतील बरौलिया गावचे माजी सरपंच सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आज शनिवारी पाचव्या आरोपीला अटक केली आहे.
 
 
 
वसीम असे या आरोपीचे नाव असून, तो या हत्येचा सूत्रधार होता, असे समजते. पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्तूल ताब्यात घेतले आहे. पोलिसांना पाहताच वसीमने गोळीबार केला, प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. या चकमकीत एक पोलिस आणि वसीम दोघेही जखमी झाले.
 
लोकसभा निवडणूक निकालाच्या दोन दिवसानंतर पाच जणांनी सिंह यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी नसीम, धर्मनाथ गुप्ता, रामचंद्र आणि गोलू या चौघांना अटक केली होती. आता या हत्याकांडाच्या सूत्रधारालाही अटक करण्यात आली आहे.