नागपुरात वादळी वाऱ्यासह पाऊस

    दिनांक :01-Jun-2019
नागपूर: गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाची दाहकता नागपूरकर सहन करत असतांनाच आज अचानक वादळी वाऱ्यांसह नागपुरात पावसाने हजेरी लावली. दुपारीनंतर अचानक हवनमानात बदल होऊन वातावरण ढगाळ झाले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह पावसाळा सुरवात झाली. अचानक आलेल्या या पावसाने मात्र नागपूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. तर दुसरीकडे वातावरणात हलकासा गारवा आल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे.